Tuesday, May 24, 2022
Homeट्रेंडिंगसर्व प्रकारचे माफिया कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहे; माजी मंत्री पंकजा...

सर्व प्रकारचे माफिया कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहे; माजी मंत्री पंकजा मुंडे

भाजपा नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील राजकारण, गुन्हेगारी व एकूण सद्य परिस्थितीवरून एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी बीड मधील माफिया कारभारावरून निशाणा साधला आहे.

“बीड जिल्ह्य़ात एका कार्यकारी अभियंताने स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केली, किती दुर्दैवी! बीलासाठी राजकीय ठेकेदार यांचा दबाव, सर्व प्रकारचे माफिया कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहे, यांची वैधानिक दखल घ्यावी.” असं पंकजा मुंडे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

शिवाय, या मुद्य्याची वैधानिक दखल घ्यावी अशी विनंती करत त्यांनी हे ट्वीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील टॅग केलं आहे.

हेही वाचा  मनी हवी कृतज्ञता! पुण्यातल्या डाॅ. तेजस्विनी कुलकर्णींचा सुरेख लेख

बीड जिल्ह्यात गुन्हेगारी, अवैध धंदे मोठ्याप्रमाणावर वाढल्याचे मागील काही दिवसांमधील घटनांवरून दिसून येत आहे. अनेक राजकीय मंडळी देखील विविध गुन्ह्यांमध्ये आढळून येत आहे

.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments