Tuesday, May 24, 2022
Homeन्युज10 वी 12 वीच्या परिक्षेबाबत राज्य शिक्षण मंडळाने घेतला महत्वाचा निर्णय

10 वी 12 वीच्या परिक्षेबाबत राज्य शिक्षण मंडळाने घेतला महत्वाचा निर्णय

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा एकदा निर्बंध वाढवले आहेत. 10 वी आणि 12 सोडून इतर सर्व वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र आता या वर्गांच्या परिक्षांबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

10 वी 12 वीच्या परिक्षेबाबत राज्य शिक्षण मंडळाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 10 वी आणि 12 वीच्या परिक्षा वेळापत्रकानुसारचं होणार असल्याचा खुलासा राज्य शिक्षण मंडळाने केला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

10 वी आणि 12 वी सोडून इतर सर्व वर्गाच्या शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेेवण्यात आले आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये परिक्षेंबाबत अनेक संभ्रम तयार झाले होते. त्यावर आता राज्य शिक्षण मंडळाने खुलासा केला आहे. परिक्षा या जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारचं होणर असल्याचं शिक्षण मंडळांनी घोषित केलं आहे.

दरम्यान, परिक्षा वेळापत्रकानुसार होणार असल्याचं शिक्षण मंडळाने सांगितलं आहे. त्यामुळे आता प्रॅक्टीकल परिक्षेंबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम अजूनच वाढला आहे. प्रॅक्टीकल परिक्षा होणार का? शिवाय तोंडी परिक्षेचं काय? असे प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे.

हेही वाचा  ओळखीचा घेतला फायदा, २० वर्षीय तरुणीवर चालत्या वाहनात अतिप्रसंग; तिघांवर गुन्हा दाखल
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments