Tuesday, May 24, 2022
Homeट्रेंडिंगमहाराष्ट्रात नाईट कर्फ्यु लागू ; सरकारने जाहीर केली नवीन नियमावली

महाराष्ट्रात नाईट कर्फ्यु लागू ; सरकारने जाहीर केली नवीन नियमावली

महाराष्ट्रात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन संसर्गाची वाढती स्थिती पाहता राज्यातील ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या आदेशात सरकारने ओमायक्रॉनचा संसर्ग पाहता काही नवे निर्बंध लागू होत असल्याचं नमूद केलं आहे.

या आदेशानुसार १० जानेवारीपासून हे नवे निर्बंध लागू होणार आहेत. यात लग्ना समारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांमधील लोकांच्या उपस्थिती संख्येवर निर्बंध लावण्यात आले आहेत.

कोणते निर्बंध लागू?

हेही वाचा  तुमचा भाजप पुरस्कृत दौरा, उ. प्रदेशात योगींचं राज्य, मग गुन्हे कोण दाखल करणार? राऊतांचा सवाल

१. पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही.

२. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही.

३. लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी.

४. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येणार.

हेही वाचा  MBBS शिक्षण हिंदीतून मिळण्यावर डॉक्टरांनी उपस्थित केले प्रश्न, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

५. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार.

६. शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार. यात केवळ १० वी, १२ वीच्या बोर्डाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा इतर सरकारी शैक्षणिक विभागांकडून आयोजिक नियोजित कृतिकार्यक्रमाला अपवादात्मक स्थितीत परवानगी असणार.

७. जलतरण तलाव, व्यायामशाळा, सौंदर्य प्रसाधनगृह बंद राहणार.

हेही वाचा  Infinix Smartphones: Note 12 लाँच करण्याच्या तयारीत Infinix , पाहा Flipkart वर कधी सुरु होणार सेल

८. केशकर्तनालये ५० टक्के क्षमतेने चालू राहतील, मात्र करोनाबाबच्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार. याशिवाय दररोज रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील.

९. खेळाच्या स्पर्धांवरही निर्बंध असणार, केवळ पूर्वनियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांना विनाप्रेक्षक परवानगी असणार.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments