Tuesday, May 24, 2022
Homeट्रेंडिंगगुजरातमध्ये गॅस स्फोट; सहा जणांचा मृत्यू तर २५ जणांची प्रकृती गंभीर

गुजरातमध्ये गॅस स्फोट; सहा जणांचा मृत्यू तर २५ जणांची प्रकृती गंभीर

गुजरातमधील सूरतमध्ये गुरुवारी मोठी दुर्घटना घडली आहे. विश्व प्रेम डाईंग अॅण्ड प्रिटिंग मिलजवळ एका टँकरमधून गॅस गळती झाल्याने मिलमधील सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गुदमरल्यामुळे या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान २५ हून अधिक जणांची प्रकृती गंभीर आहे. पहाटे प्रिटिंग मिलमध्ये झालेल्या या दुर्घटनेनंत खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिलजवळ असलेल्या नाल्यात एका अज्ञात टँकरचा चालक विषारी केमिकल टाकत होता. यावेळी विषारी वायूची गळती होऊ लागली. जवळच असणारे मिलमधील कर्मचाऱी या विषारी वायूच्या संपर्कात आले.

हेही वाचा  स्कॉर्पिओ-इर्टिगाची धडक, भीषण अपघातात ६ जण जागीच ठार

दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र या दुर्घटनेने खळबळ उडाली असून चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

याआधी गुजरामधील अहमदाबादमध्ये कपड्याचा कारखान्यात टाकी साफ करत असताना सहा कामगाराचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा  शिवसेनेच्या नेतृत्त्वात संभाजीनगरात पाण्याचा सत्यानाश, फडणवीसांचा घणाघाती आरोप
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments