Tuesday, May 24, 2022
Homeआरोग्यमुंबईमध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता

मुंबईमध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता

सध्या देशासह राज्यातील कोरोनाचा आकडा वाढताना दिसत आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचं सहर असलेल्या मुंबईतही कोरोनाचे आकडे वाढताना दिसत आहेत. जर मुंबईतील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या पार पोहोचला तर शहरात लॉकडाऊन सारखी कठोर पावलं उचलावी लागतील, असं मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं. तसेच मुंबईतील दैनंदिन रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे असल्याचंही याच मुलाखतीत बोलताना इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा  Budget Smartphones: Samsung ते Realme…२० हजारांच्या बजेटमध्ये एकापेक्षा एक भन्नाट फीचर्ससह येणारे ‘हे’ आहेत बेस्ट स्मार्टफोन्स

मुलाखतीत बोलताना मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले की, “सध्या शहरात 30 हजार बेड उपलब्ध आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतही मुंबईतील लॉकडाऊनबाबत चर्चा करण्यात आली आहे. सध्या कठोर निर्बंध लादण्याचा कोणताही विचार नाही. जर मुंबईत एका दिवसात 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले, तर कठोर निर्बंध लादण्याबाबत विचार केला जाऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे, यामध्ये आधीप्रमाणे केवळ पॉझिटिव्हिटी दर नाहीतर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची आणि बेड्सच्या उपलब्धतेची संख्याही लक्षात घेतली जाईल.

हेही वाचा  धक्कादायक: प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments