Tuesday, May 24, 2022
Homeट्रेंडिंगघाटकोपरमधील झोपडपट्टीत गोदामाला भीषण आग

घाटकोपरमधील झोपडपट्टीत गोदामाला भीषण आग

मुंबईतील घाटकोपरमधील असल्फा भागात आज सकाळी एका गोदामाला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ताज्या माहितीनुसार, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

घाटकोपरमधील असल्फा हिमालय सोसायटीच्या झोपडपट्टीत असलेल्या गोदामाला ही आग लागल्याचे वृत्त आहे. गोदामाला लागलेली आग झोपडपट्टीपर्यंत पसरू लागल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची UG, PG विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी

या ठिकाणी इंजेक्शन बनवण्याचं काम सुरू होतं. सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमुळे आकाशात काळ्या धुरांचे लोट दिसत आहेत. या परिसरात मोठ्याप्रमाणवर नागरी वस्ती आहे व विविध छोट्या कंपन्या देखील आहेत. त्यामुळे अधिक सावधगिरी बाळगली जात आहे.

हेही वाचा  तब्बल ९ हजाराची सूट, स्वस्त किंमतीत मिळतोय Oppo चा हा स्मार्टफोन
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments