Tuesday, May 24, 2022
Homeब्रेकिंगभीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसर येणार नव्या रुपात

भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसर येणार नव्या रुपात

शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसरात अनेक विविध सोयी-सुविधा करण्यात येणार याहे. त्यामुळे येथील परिसराचा कायापालट होणार आहे. आज कोरेगाव भीमामध्ये 204 वा शौर्यदिन साजरा करण्यात आला. मध्यरात्री 12 वाजता बुद्धवंदना करण्यात आली. यावेळी विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती

हेही वाचा  मध्य रेल्वेवर शनिवारी रात्री मेगाब्लॉक; येथे वाचा लोकलचे संपूर्ण वेळापत्रक

204 वा शौर्यदिन साजरा करताना विविधरंगी फुलांच्या सजावटीसह विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला. मध्यरात्रीपासून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीही विजयस्तंभाला अभिवादन केले.

हेही वाचा  प्लॅस्टिक पिशवीत मृत अर्भक रस्त्यावर फेकलं, गाडीने चिरडलं; अकोल्यात खळबळजनक घटना

ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरात मूलभूत सोयी सुविधा , सुशोभिकरण आणि अन्य विकासाची तसेच शौर्य दिन तसेच दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन आणि नियोजन यापुढे सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात येणार आहे. तर या परिसराचा विकास आणि सुशोभीकरणासाठी समिती गठित करण्यात आली आहे. समितीने नवीन आराखडा शासनाकडे मांडला आहे त्यामुळे भीमा कोरेगाव विजयस्तंभ लवकरच नव्या रुपात येणार आहे.

हेही वाचा  पेपर मिलच्या लाकूड डेपोला भीषण आग; साडेसात कोटींचे लाकूड जळून खाक, पेट्रोल पंपही जळाले
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments