Tuesday, May 24, 2022
Homeआरोग्यमंदिर चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातेवाईकांना 12 लाखांची मदत

मंदिर चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातेवाईकांना 12 लाखांची मदत

माता वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झालेत. घटनास्थळी सुरू असलेले बचावकार्य संपले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, वैष्णोदेवी मंदिरातील चेंगराचेंगरीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा  Ola Scooter मिळेल मोफत फक्त हे काम करावे लागले; भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर दिली माहिती

नवीन वर्षाच्या निमित्ताने जम्मूतील वैष्णोदेवी माता मंदिरातून वाईट बातमी आली आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी पोहोचले होते आणि यादरम्यान माता वैष्णोदेवी भवनात चेंगराचेंगरी झाली. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीच्यावतीने मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे, जम्मू-काश्मीर एलजीने या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

हेही वाचा  युरोपियन देशात कोरोना नंतर Monkeypox चा वाढला धोका, भारत सरकारने दिल्या मार्गदर्शक सूचना
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments