काल विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचाचा दिवस होता. मात्र हा शेवटचा दिवस विरोधकांच्या गोंधळानेच सर्वाधिक गाजला. काल राज्यपालांचे अधिकार कमी करणारे विद्यापीठ सुधारणा विधेयक गोंधळात मंजूर करण्यात आले. मात्र या विधेयकाला भाजपने विरोध केला असून जानेवारी महिन्यात ठाकरे सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही विधेयक चर्चेविना मंजूर करण्यात आल्याने टीका केली आहे.
विद्यापीठांना सरकारी महामंडळ करण्याचं काम सुरू आहे.विद्यापीठांवर सरकारचा ताबा आणला जात असून सगळे अधिकार थेट मंत्री घेत आहेत. यामुळे विद्यापीठाचा सत्यानाश होईल. तुमच्या PA कडे रांगा लागतील. मर्जीनुसार कोर्सेस तयार केले जातील. असा घणाघात चित्रा वाघ यांनी ट्वीट करत केला आहे.