पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरत असलेल्या गाड्यांमध्ये आता मर्सिडीज सारख्या आलिशान कार बनविणाऱ्या जर्मन कंपनीची निर्मिती असणारी मेबॅच एस६५० या गाडीचा सामावेश झाला आहे. ही गाडी जगातील सर्वात महागड्या बुलेट प्रूफ गाड्यांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. मात्र आता यावरूनच महाराष्ट्र राज्यातील काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मोदींवर अप्रत्यक्ष शाब्दिक हल्ला केला आहे.
‘हम तो फ़कीर आदमी है, झोला ले के चल पड़ेंगे जी!’ असे ट्वीट करत सचिन सावंत यांनी मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. मेबॅच एस६५० गार्ड ही गाडी सर्वात सुरक्षित गाड्यांपैकी एक आहे. या गाडीला व्हीआर १० स्तराची सुरक्षा असून ती सर्वांत महागडी गाडी आहे.