Tuesday, May 24, 2022
Homeब्रेकिंगफडणवीस यांना मुख्यमंत्री करा; रामदास आठवले यांनी दिला सल्ला

फडणवीस यांना मुख्यमंत्री करा; रामदास आठवले यांनी दिला सल्ला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया पार पडली आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस आराम करण्यास सांगितले आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून ते घरूनच कार्यालयीन कार्य करत आहेत. मात्र, आता हिवाळी अधिवेशनालाही मुख्यमंत्री अनुपस्थित राहिल्यामुळे विरोधकांनी मु्ख्यमंत्र्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. या वादात आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही उडी घेतली आहे.

हेही वाचा  शिवसेना धक्कातंत्राच्या तयारीत, कोल्हापूरच्या कट्टर शिवसैनिकाचं नाव चर्चेत, संभाजीराजेंना शह?


रामदास आठवले यांनी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा सल्ला दिला आहे. मला वाटतं की, मुख्यमंत्रीपद इतर कोणाकडे तरी सोपवावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत ही गोष्ट खरी आहे. अजून त्यांना ठिक होण्यासाठी 2-3 महिन्यांच्या कालावधी आहे, असं आठवले म्हणाले आहेत.

हेही वाचा  तुम्हालाही बिझनेस करायचा आहे? मग "हा" व्यवसाय करून कमवा लाखो रुपये
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments