Airtel नंतर आता Vodafone Idea ने देखील आपले सर्व प्री-पेड प्लॅन महाग करून ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. Vodafone-Idea चा नवीन प्लॅन 25 नोव्हेंबरपासून लागू होतील. एअरटेलचे नवीन प्लॅन २६ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.
Vodafone Idea ने देखील Airtel प्रमाणे आपल्या प्लॅनमध्ये बदल केले आहेत. Vodafone-Idea चा सर्वात स्वस्त प्लॅन आता ९९ रुपयांचा आहे, जो आधी ७९ रुपयांचा होता. कंपनीने म्हटले आहे की प्लॅनच्या किमती वाढल्याने प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) वाढण्यास मदत होईल.
चला जाणून घेऊया सर्व योजनांबद्दल
सर्वात स्वस्त प्लॅन आता 99 रुपयांचा
vi चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन पूर्वी ७९ रुपये होता, जो आता ९९ रुपये झाला आहे. बेस प्लॅनची किंमत 20 रुपयांनी वाढली आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 99 रुपयांचा टॉकटाइम मिळेल. याशिवाय यामध्ये 200 एमबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. यात अमर्यादित कॉलिंगची सुविधा नाही. या प्लॅनमध्ये 1 पैसे प्रति मिनिट दराने कॉलिंग करता येणार आहे.
149 रुपयांचा प्लॅन आता 179 रुपयांचा
या वाढीनंतर Vodafone Idea चा 149 रुपयांचा प्लान आता 179 रुपयांचा झाला आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता, एकूण 2 GB डेटा, एकूण 300 SMS आणि अमर्यादित कॉलिंग सर्व नेटवर्कवर उपलब्ध असेल.
219 रुपयांचा प्लॅन झाला 269 रुपये
Vodafone Idea ने आता 219 रुपयांच्या प्लानची किंमत 269 रुपये केली आहे. यामध्ये दररोज १०० एसएमएससह १ जीबी डेटा आणि अमर्यादित कॉलिंग मिळेल. त्याची वैधता 28 दिवस आहे. एअरटेलच्या या रेंजच्या प्लानची किंमत 265 रुपये आहे.
249 चा प्लॅन झाला 299 रुपयांचा
vi चा प्लॅन ज्याची किंमत आधी 249 रुपये होती, ती आता 299 रुपयांवर गेली आहे. या प्लॅनची वैधता देखील 28 दिवसांची आहे. यामध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस आणि 1.5 जीबी डेटा दररोज मिळेल.
299 रुपयांचा प्लॅन झाला 359 रुपयांचा
Vi ग्राहकांना आता 299 रुपयांऐवजी 359 रुपये द्यावे लागतील. यामध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंगसह दररोज 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतील. त्याची वैधता 28 दिवस आहे.
399 चा प्लान झाला 479 रुपयांचा
Vodafone Idea चा 399 रुपयांचा प्लान, जो 56 दिवसांच्या वैधतेसह येतो, तो आता 479 रुपयांचा झाला आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतील.
449 रुपयांचा प्लॅन झाला 539 रुपयांचा
56 दिवसांच्या वैधतेसह 449 रुपयांचा प्लॅन आता 539 रुपयांचा झाला आहे. यामध्ये अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस सुविधेसह दररोज 2 GB डेटा आहे. एअरटेलच्या 449 रुपयांच्या प्लॅनची किंमत 26 नोव्हेंबरपासून 549 रुपये असेल.
379 चा प्लॅन झाला 459 ररुपयांचा
कंपनीचा 379 रुपयांचा प्लॅन, जो 84 दिवसांच्या वैधतेसह येतो, तो आता 459 रुपयांचा झाला आहे. यात एकूण 6 जीबी डेटा, दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा आहे.
599 चा प्लॅन झाला आता 719 रुपयांचा
वोडाफोनचा 599 रुपयांचा प्रीपेड प्लान आता 719 रुपयांचा आहे. 84 दिवसांच्या वैधतेसह, यात दररोज 1.5 GB डेटा, दररोज 100 SMS आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा आहे.
699 रुपयांचा प्लॅन झाला 839 रुपयांचा
Vodafone Idea चा 699 रुपयांचा प्रीपेड प्लान आता 839 रुपयांचा झाला आहे. 84 दिवसांच्या वैधतेसह, यात दररोज 2 GB डेटा आहे, दररोज 100SMS
स्वराज्य डिजिटल मॅगझीन मध्ये जाहिरात करण्यासाठी संपर्क: 93595 26703 । अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा