Tuesday, May 24, 2022
HomePopular Postsशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन!...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन!…

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत मालवली आहे. सोमवारी म्हणजेच १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते १०० वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू होते. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बाबासाहेबांच्या निधानानंतर राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले त्यांना श्रद्धांजली अर्पण केले  

हेही वाचा  मनी हवी कृतज्ञता! पुण्यातल्या डाॅ. तेजस्विनी कुलकर्णींचा सुरेख लेख

इतिहासाच्या अभ्यासपूर्ण लेखनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र घराघरात पोहचवण्याचे काम बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. ‘महाराष्ट्र भूषण’ ही पदवी महाराष्ट्र सरकारने त्यांना बहाल केली होती.  तब्बल साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी इतिहास संशोधनावर काम केले.

हेही वाचा  महत्त्वाची बातमी! ...म्हणून ३१ मे रोजी देशभरात रेल्वे धावणार नाही?, वाचा सविस्तर

देशा-परदेशात अखंड भ्रमंती सुरू असलेल्या बाबासाहेबांनी नुकतेच शंभराव्या वर्षांत पदार्पण केले होते. त्यांच्या निधनाने एक इतिहास तज्ञ गमावल्याची भावना जाणकारांनी व्यक्त केली आहे.
———————————————-
🙏 विनंती: खालील लिंकचा वापर करून आपल्या प्रियजनांना स्वराज्य डिजिटल मॅगझीनला जॉईन करा 👉 http://swarajya24.com
———————————————

हेही वाचा  नव्या शाळांच्या प्रस्तावांची कसून तपासणी होणार, शिक्षण विभागाचा महत्वाचा निर्णय
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments