अभिनेता शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे यांच्या अभिनयाची जुगलबंदी ‘दे धक्का’ सिनेमातून प्रेक्षकांनी बघितली. त्यांचीही जुगलबंदी पाहून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन झाले होते. २००८ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर निर्मात्यांनी या सिनेमाचा सिक्वेल करण्याचा निर्णय घेतला. या सिनेमाचा सिक्वेल अर्थात दे धक्का २ लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचे निर्माता अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर या सिनेमाचे पोस्टर आणि रिलीजची तारीख शेअर केली आहे.
या तारखेला येणार दे धक्का २
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट विभागाचे प्रमुख आणि निर्माते अमेय खोपकर ‘यांनी दे धक्का २’ सिनेमाचे नवेकोरे पोस्टर ट्विटवर शेअर करत या सिनेमाच्या प्रदर्शनची तारीख जाहीर केली. अमेय खोपकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, दे धमाल हसवणुकीचा दुसरा डोस महेश मांजरेकर दिग्दर्शित दे धक्का २ तारीख ठरली.
१ जानेवारी २०२२ थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय’ असे म्हणत त्यांनी या सिनेमाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव या दोघांना टॅग केले आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही इन्स्टाग्रामवर या सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. त्याच्या या पोस्टला त्याचे कलाकार मित्रमंडळी आणि त्याचे चाहते भरभरून कॉमेन्ट करत आहेत
———————————————-
🙏 विनंती: खालील लिंकचा वापर करून आपल्या प्रियजनांना स्वराज्य डिजिटल मॅगझीनला जॉईन करा 👉 http://swarajya24.com
———————————————-