Tuesday, May 24, 2022
HomePopular Postsपुण्यातील शिल्पकार तरुणीच्या शिल्पाकृतीचं सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक!

पुण्यातील शिल्पकार तरुणीच्या शिल्पाकृतीचं सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक!

पुण्यातील आंबेगाव येथील शिल्पकार सुप्रिया शिंदे या राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पुतळा बनवण्याचे काम करीत आहेत. दरम्यान, याठिकाणी खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच हजेरी लावली आहे. त्यावेळी हुबेहूब शरद पवार यांचा पुढं पुतळा पाहून खा. सुप्रिया सुळे या चांगल्याच चकित झाल्या आहेत. आंबेगाव परिसरातील विकासकामांच्या लोकार्पण दौऱ्यावेळी सुळे यांनी पुतळ्याच्या कामा ठिकाणी भेट दिली. त्यावेळी शिंदे याचं आकर्षक काम बघून त्यांनी त्याचं कोतुक केलं आहे

हेही वाचा  मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; मुंबईतील दोघे जागीच ठार, चौघे जखमी

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुणे येथील सुप्रिया शेखर शिंदे या शिल्पकार तरुणीच्या वर्कशॉपला भेट दिली. या वर्कशॉपमध्ये सुप्रिया करीत असलेले काम थक्क करणारे आहे. येथे त्यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि बालशिवाजी यांचे देखणे शिल्प साकारले आहे. याशिवाय आदरणीय शरदचंद्रजी पवार  साहेबांचे शिल्पही चित्तवेधक आहे, अशा शब्दात खा. सुळे यांनी शिल्पकार सुप्रिया शिंदेचं तोंडभरुन कौतुक केलं आहे

पुण्यातील आंबेगाव येथील सुप्रिया शिंदे या शिल्पकार आहेत. माहेरी वडिलांच्या गणपती बनवण्याच्या कारखान्यात मातीला आकार देणाऱ्या सुप्रिया यांनी भारती विद्यापीठातील फाईन आर्टस् महाविद्यालयातून शिक्षण घेऊन शिल्पकलेला सुरूवात केली. पती शेखर शिंदे यांच्या भक्कम आधारावर माती, प्लॅस्टर, फायबर ते थेट पंचधातूचे पुतळे बनवण्यात यशस्वी झाल्या. दरम्यान, मागील 8 वर्षांत मागणी प्रमाणे शेकडो कलाकृती आणि पुतळे राज्यासह देशभरात पोहचवल्या आहेत.
या दरम्यान शरद पवार यांच्या पुतळ्याची संकल्पना पुढे आली. आणि त्यांनी ते आव्हान पेलले आहे. विशेष म्हणजे या कामाची फायबर कॉपी पुर्ण होवून पंच धातूचे 2 भाग पुर्ण झाले आहेत. शरद पवार यांच्या चेहर्यातील अत्यंत सुक्ष्म बारकावे ठळकपणे टिपण्यासाठी शिंदे यांनी अधिक कष्ट घेतले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस, रंगनाथ स्वामी, स्वामी नारायण, सुखदेव व भगतसिंह यांचे धातूचे पुतळे बनवून दिले आहेत. माजी खासदार कै. किसनराव बाणखीले यांच्या पुर्णाकृती पंचधातूच्या पुतळ्याचे काम पुर्ण केले आहे

हेही वाचा  Budget Smartphones: Samsung ते Realme…२० हजारांच्या बजेटमध्ये एकापेक्षा एक भन्नाट फीचर्ससह येणारे ‘हे’ आहेत बेस्ट स्मार्टफोन्स

———————————————-
🙏 विनंती: खालील लिंकचा वापर करून आपल्या प्रियजनांना स्वराज्य डिजिटल मॅगझीनला जॉईन करा 👉 http://swarajya24.com
———————————————-

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments