Tuesday, May 24, 2022
HomeLifestyleडॉक्टरांच्या 'या' ४ सल्ल्यांचे पालन कराल तर निरोगी आयुष्य जगाल..!

डॉक्टरांच्या ‘या’ ४ सल्ल्यांचे पालन कराल तर निरोगी आयुष्य जगाल..!

कोरोना विषाणूच्या या तथाकथित साथीच्या रोगाने आपल्याला कळले की जीवन व आरोग्य किती महत्त्वाचे आहे. म्हणजे एका आजाराच्या उद्रेकाने आपल्याला जाणीव झाली की स्वास्थ्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हाच खरा उपाय आहे असे म्हटले जाते. त्यामुळे डॉक्टर आपल्याला ‘असे’ मार्गदर्शन करतात की ज्यामुळे आपण कोणत्याही आजारांना बळी पडणार नाहीत. चला तर मग डॉक्टरांच्या या सल्ल्याची माहिती घेऊया…

हे ४ मंत्र आहेत आपल्या सुदृढ आरोग्यासाठी व सुरक्षित जीवनासाठी. तब्येतीच्या कोणत्याही तक्रारी होऊ नयेत आणि शांत, निरामय जीवन जगता यावे यासाठी आपण खालील गोष्टी केल्यास लाभ होऊ शकतो. काय सल्ले आहेत डॉक्टरांचे ते आपण जाणून घेऊया…

१. व्यायाम करा:

आजकाल माणूस कामात इतका गुरफटला आहे की त्याला स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळच नाही. आपण व्यायाम न करता वरवरून निरोगी व धडधाकट दिसतो, प्रत्यक्षात आपण आतून अजिबात सुदृढ नसतो. आपण कधीही कोणत्याही आजाराला बळी पडू शकतो.

म्हणून दिवसातून किमान अर्धा तास व्यायाम करावा. सूर्यनमस्कारसारखे सोपे व्यायाम केले तरी चालतील. शारीरिक कसरत केल्याने त्वचेवरील रंध्रे मोकळी होतात. ऑक्सिजनचे चलनवलन वाढते. शरीर निरोगी राहण्याची हमी मिळते. त्यामुळे चांगल्या आहारासोबतच रोज व्यायाम करणेसुद्धा आवश्यक आहे.

२. मानसिक स्वास्थ्य जपा:

कोरोन लॉकडाऊनमुळे शरीराने आपण सध्या घरात बंद आहोत आणि आपल्या मनावर एका गोष्टीने इतके गारुड केले आहे की त्याशिवाय आपण मानसिकदृष्ट्या स्वस्थ (?) राहू शकत नाही, कोणती आहे ती गोष्ट? ते आहेत गॅजेट्स… मोबाईल, कम्प्युटर, टीव्ही या डिव्हायसेसनी आपल्याला मानसिक लॉकडाऊनमध्ये ठेवले आहे.

या विचित्र परिस्थितीत आपला घरात व बाहेर संपर्क कमी झाला आहे. की असे व्हावे म्हणूनच ‘दो गज के दूरी’ आपल्यावर लादली जात आहे? जी काही परिस्थिती ओढवली आहे, त्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे स्वतःला आनंदी ठेवणे. स्वतःशी व पर्यायाने समाजाशी संवाद संपल्याने गेल्या 2 वर्षांत अनेक लोक नैराश्याचे शिकार झाले आहेत.

अशावेळी आपली मनस्थिती उत्तम कशी राहील हे पाहणे गरजेचे आहे. टीव्ही कमीत कमी बघा, सोशल मीडियाचा वापर कमी करा, मोबाईल वापरण्याची वेळ ठरवून घ्या. जेवढे तुम्ही आनंदी व निश्चिंत राहाल, तेवढा हा काळ तणावमुक्त व्यतीत होईल.

३. व्यसनमुक्त व्हा:

आपल्यावर सिनेमाचा इतका पगडा असतो की आपला आवडता कलाकार जे करतो, तेच आपण करतो. त्यामुळे आपल्याला सिगरेट, गुटखा, मद्य, अमली पदार्थ यांचे व्यसन लागते. सार्वजनिक ठिकाणी उभे राहत सिगरेट हातात आणि ती वलये हवेत पसरवणे हे रोमांचित करणारे असले, तरी ते आरोग्याला किती हानिकारक आहे हे आपण जाणतो.

कधीच धूम्रपान वा मद्यपान करू नका, कारण त्यामुळे शरीराचे झाले तर नुकसानच होते. फायदा त्यात अजिबात नाही. त्यामुळे व्यसन करायचे असेल तर चांगल्या सवयींचे करा. शरीराला ज्यामुळे अधिकाधिक फायदा होईल. जीवन अधिक निरोगी राहील.

४. जंक फूडचा नाद सोडा:

लहान मुले ते वयोवृद्ध या सर्वांना सध्या खाण्याचे वेड लावले आहे ते जंक फूडने. याचा एकच फायदा म्हणजे हे चवीला अत्यंत चांगले असते. तात्पुरती भूक मिटते. बस्स..! बाकी यामुळे शरीराला फायदा काहीही होत नाही. उलट भयंकर नुकसान होऊ शकते.

जंक फूडमुळे आपल्याला हृदयविकार, मधुमेह, स्थूलपणा असे जीवनशैलीसंबंधित आजार होऊ शकतात. मागे तर भारतात मॅगी नूडल्सवर बंदी घालण्यात आली होती. कारण त्यात शिसे आढळून आले होते. जो विषारी घटक असतो.

हेही वाचा  शिवसेनेच्या नेतृत्त्वात संभाजीनगरात पाण्याचा सत्यानाश, फडणवीसांचा घणाघाती आरोप

वेळीअवेळी जंक फूड खाल्ल्याने जेवणाच्या वेळा चुकतात. कधीकधी जेवणच नकोसे होऊ लागते. म्हणून आताच जंक फूड खाणे सोडून द्या. त्याऐवजी घरचे ताजे, रुचकर, पौष्टिक व गरमागरम जेवण कधीही उत्तम..!

लोकांनी स्वत:ची अधिकाधिक काळजी घेतली, तर आजारी पडून आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही. यामुळे आरोग्यव्यवस्थेवरील ताण कमी होऊन अतिशय गंभीर आजाराने पीडित लोकांना सुविधा वेळेवर उपलब्ध होतील.

हेही वाचा  'शरद पवार यांची ही जुनीच नीती, पण जनता भुलणार नाही'; भाजप नेत्याचा टोला

एका आकडेवारीनुसार, भारतात १ हजार नागरिकांमागे १ डॉक्टर आहे. हे गुणोत्तर फारच असंतुलित आहे. त्यामुळे आपण आरोग्याची काळजी घेतली, तर आपला आरोग्यावरील खर्चही वाचेल आणि डॉक्टरांचा ताणही कमी होईल.


???? विनंती: खालील लिंकचा वापर करून आपल्या प्रियजनांना स्वराज्य डिजिटल मॅगझीनला जॉईन करा ???? http://swarajya24.com

???? जाहिरातिसाठी संपर्क: 77220 35765

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments