माणसाला नेहमी सुरस, चमत्कारिक व विलक्षण गोष्टींमध्ये रस असतो. हा मूळ मानवी स्वभावच आहे. कारण माणसाला जग जाणून घ्यायचे असते. त्याला या जगाच्या, ब्रह्मांडाच्या गूढतेचे प्रचंड कुतूहल आहे. त्यामुळे तो गेल्या शेकडो वर्षांत इतकी मोठी मजल मारू शकला.
या भौतिकतावादी जगात माणसाला माणसाबद्दल जाणून घेण्याची सुद्धा उत्सुकता असते. त्याला सेलिब्रेटी, खेळाडू, राजकारणी यांच्या जीवनाचे आकर्षण असते. त्यांना सर्वसामान्य माणूस ‘आदर्श’ मानतो. त्यांचे अनुकरण करतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल काहीही ऐकायला, वाचायला मिळाले तरी आपण त्यात हिरिरीने प्रतिसाद देतो.
जगातील अनेक क्षेत्रांत प्रसिद्ध असणाऱ्या, नावलौकिक असणाऱ्या व्यक्ती त्यांची उच्चभ्रू जीवनशैली, विचारसरणी व व्यक्तिमत्त्व यामुळे चर्चेत असतात. आज आपण यांतील काही खास व्यक्तींच्या अजब सवयी जाणून घेणार आहोत.
ब्लादिमीर पुतीन:
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांची दिनचर्या एकदम वेगळी आहे. पुतीन यांची खरी ‘सकाळ’ दुपारी सुरु होते. ते रात्री उशिरापर्यंत काम करतात.
त्यामुळे ते काम संपल्यावरच झोपतात व थेट दुपारी उठतात. पुतीन यांची दिनचर्या अतिशय कडक आहे. ते ती तंतोतंत पाळतात. दुपारी उठल्यावर न्याहारी करणे, त्यानंतर दोन तास पोहायला जाणे, मग व्यायाम करणे आणि कोमट पाण्याने अंघोळ करणे अशी त्यांची दैनंदिनी आहे.
एलिझाबेथ II:
द ग्रेट ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना वटवाघूळ या पक्ष्याबद्दल विशेष प्रेम आहे. कोरोनाचा उगम वटवाघूळ या पक्ष्यातून झाला आहे असा दावा केला जातो. तरीही राणीचे वटवाघळावरील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.
राणी एलिझाबेथ यांनी त्यांच्या महालातील मुख्य हॉलमध्ये त्यांच्या वटवाघळासाठी शाही सुरक्षा नियुक्त केली आहे. त्यांच्या महालाचे हाऊसकीपिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आदेश दिले गेले आहेत की त्यांनी वटवाघळाला त्रास देवू नये.
पोप फ्रान्सिस:
ख्रिश्चन कॅथॉलिक धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचा आवडता खेळ फुटबॉल आहे. त्यांना पिझ्झा सुद्धा आवडतो. पण त्यांची सर्वांत आवडती गोष्ट म्हणजे आफ्रिकी डान्स फॉर्म ‘टँगो’. ते तरुण वयात या डान्सचा सराव करत.
दलाई लामा तेन्जिंग ग्यात्सो:
तिबेटी धर्मगुरूंना दलाई लामा असे म्हणतात. सध्याचे दलाई लामा म्हणजे तेन्जिंग ग्यात्सो यांना घड्याळ दुरुस्ती काम करणे मनापासून आवडते. घड्याळांचे भाग सुटे करून ते पुन्हा जोडणे हा त्यांचा छंद आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दलाई लामा यांना एक घड्याळ भेट दिले होते. ते घड्याळ आजही दलाई लामा वापरतात.
एन्जेला मर्केल:
सन २००५ पासून जर्मनीच्या चान्सेलर म्हणून काम करीत असलेल्या एन्जेला मर्केल यांची ‘टाईम’ या जगप्रसिद्ध मासिकाने काही वर्षांपूर्वी ‘जगातील सर्वांत शक्तिशाली महिला’ म्हणून संभावना केली होती. त्यांच्या आयुष्याची ३५ वर्षे कम्युनिस्ट सत्ता असलेल्या पूर्व जर्मनीत गेली. त्याकाळात त्यांना जीवनाश्यक वस्तूदेखील मिळत नसत. त्या मिळण्यासाठी त्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागे. त्यामुळे त्या सर्व गोष्टी घरात सांभाळून ठेवतात. अगदी गरज नसणाऱ्या वस्तूंचा देखील यात समावेश आहे.
इम्रान खान:
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान खाण्यापिण्याच्या बाबतीत अतिशय बेफिकीर आहेत. त्यांची दुसरी पत्नी रेहम खान यांचे हे म्हणणे आहे. रेहम खान सांगतात, इम्रान अनेकवेळा काहीच न खाता-पिता झोपून जातात किंवा नोकरांच्या घरून जेवण मागवून घेतात.
???? विनंती: खालील लिंकचा वापर करून आपल्या प्रियजनांना स्वराज्य डिजिटल मॅगझीनला जॉईन करा ???? http://swarajya24.com
???? जाहिरातिसाठी संपर्क: 77220 35765