Tuesday, May 24, 2022
HomeLifestyleझोप उडालीय..? 'या' तीन गोष्टी करा…

झोप उडालीय..? ‘या’ तीन गोष्टी करा…

रात्रीची झोप फार महत्त्वाची असते. संशोधनानुसार, प्रौढ व्यक्तीने रोज रात्री ७ ते ८ तास झोप घेतलीच पाहिजे. पण अलीकडे मोबाईल फोन, टीव्ही, कम्प्युटर आणि सोशल मीडिया यांच्या सर्रास वापरामुळे मेंदू व डोळे यांच्यावर प्रचंड ताण पडतो.

त्यामुळे रात्री निद्रानाशाची समस्या नेहमीची झाली आहे. अनेकांना एकदाची झोप उडाली की रात्रभर सतत या कुशीवरून त्या कुशीवर जावे लागते पण झोप येत नाही. याचा परिणाम दुसऱ्या दिवसाच्या कामावर होतो. यामुळे इतर अनेक आजारही उद्भवतात. आपण आज यावर उपाय म्हणून तीन सोप्या गोष्टी बघणार आहोत.

रात्री झोप न झाल्याने दिवसभर थकवा जाणवतो. नैराश्य व चिंता या समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून खाली दिलेल्या उपायांचे अनुसरण करू शकता.

योगा:
दररोज २० मिनिटे योग केल्यास चांगली झोप येऊ शकते. योगामुळे स्नायूंनाच आराम मिळतो असे नाही, तर आपले मनही शांत होते. खास योग तज्ज्ञांकडून विविध आसने शिकून घेतल्यास तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने आसने करू शकाल. त्यानंतर काही दिवसांतच तुम्हाला छान वाटेल व रात्री शांत झोपही लागेल.

ध्‍यान:
ध्यानधारणा ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे. ध्यान केल्याने अनेक फायदे होतात. दिवसातून ४-५ वेळा फक्त ५ मिनिटे शांत बसून राहा. डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. हे दररोज केल्यामुळे तुमचा ताणतणाव कमी होईल आणि आपल्या भावनांवर नियंत्रण राहील. मन शांत होईल. त्यामुळे तुमची झोपही चांगली होईल.

मंत्रजाप:
रात्री झोपण्यापूर्वी १ ते १०० हे आकडे हळुवार उलट म्हणा. यामुळे मेंदू कार्यमग्न होतो व काहीवेळाने शांत झोप येते. ऐकायला विचित्र वाटेल, पण असे करणे हे सुद्धा एकप्रकारचा मंत्रजाप आहे. मनाला शांत करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. रात्री झोप येत नसेल तर काही मंत्रांचा जप करा. आपल्याला इतर मंत्र माहीत नसतील, तर आपण ओमचा जप करू शकता.


???? विनंती: खालील लिंकचा वापर करून आपल्या प्रियजनांना स्वराज्य डिजिटल मॅगझीनला जॉईन करा ???? http://swarajya24.com

???? जाहिरातिसाठी संपर्क: 77220 35765

हेही वाचा  भूमिका बदलली आणि शब्द फिरवला नाही तर ते शरद पवार कसले?: निलेश राणे
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments