Tuesday, May 24, 2022
HomeEditor Picksसंकटकाळात धीरोदात्तपणे जगण्याचे रहस्य 'गीते'मध्ये..!

संकटकाळात धीरोदात्तपणे जगण्याचे रहस्य ‘गीते’मध्ये..!

जीवनातील अशी कोणती गोष्ट आहे जिचे वर्णन ‘भगवद्गीते’मध्ये नाही..? जगण्याचे सार म्हणजे ‘गीता’. गीतेचा प्रत्येक उपदेश चिंतनीय आणि अनुकरणीय आहे. जन्मापासून मृत्युपर्यंत माणूस ज्या ज्या संकटांना तोंड देतो, ज्या ज्या हालअपेष्टा सहन करतो त्याचे सर्व वर्णन, उपाय व समाधान आपल्याला गीतेच्या वचनांमध्ये सापडते.

आजच्या काळात तर ‘गीता’ अतिशय मोलाची आहे. माणूस जगण्याच्या सर्व आघाड्यांवर हरलेला दिसतो आहे. अशावेळी त्याचे जीवन तारण्यासाठी गीतेची मधुर वचने प्रेरणादायी ठरतात. संकटे तर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत.

पण त्यातूनही सुखाचा मार्ग कसा अवलंबायचा हे आपल्या कृतीवर आधारित आहे. आपल्या कृतीला योग्य दिशा देण्याचे काम ‘गीता’ करते. बिकट परिस्थिती कशी सावरायची, आपण कसे धीरोदात्तपणे अडचणींना सामोरे जायचे आणि त्यातून मार्ग काढून सुखद जीवन जगायचे यासाठी ‘गीते’त ही खास तत्त्वे सांगितली आहेत, ती आपण बघूया.

हेही वाचा  मिरजोळे येथे विमानतळासाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा, उदय सामंत यांची यशस्वी मध्यस्थी

१. आत्मा अमर्त्य आहे:

माणसाचा मृत्यू होतो म्हणजे त्याचं फक्त शरीर मरते. ज्यांचा मृत्यू होतो, ते केवळ देहत्याग करतात. आत्मा पुन्हा इतर कुठेतरी मानवी शरीरात प्रवेश घेतो. मग मृत्यूची काळजी कशाला करायची? आपण का घाबरतो? घाबरणे हेच अनाठायी आहे. आत्मा अमर आहे. आत्मा अमर्त्य आहे. त्याची कोणीही हत्या करू शकत नाही. आत्म्याचे अस्तित्व न संपणारे आहे.

अर्जुनाला ‘गीते’चे सार सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतो की आत्म्याला वारा सुकवू शकत नाही. पाणी भिजवू शकत नाही. अग्नी जाळू शकत नाही. शस्त्र कापू शकत नाही. आत्मा शाश्वत आहे.

२. मृत्यू अटळ आहे:

जगात असे कोणीही नाही की जो अमर होण्याचे वरदान घेवून आला आहे. मृत्यू अटळ आहे. मानवी जीवन व भौतिक जीवन हे निमित्तमात्र आहे. आज नाही, तर उद्या मरण येणारच आहे. त्यामुळे मृत्यूला भ्यायचे कशाला..? ज्याने जन्म घेतला, त्याचा मृत्यू निश्चित आहे. कोणीही सोबत जन्माला येत नाही, सोबत मृत्यू पावत नाही. मग एकटे येणार आणि एकटे जाणार असाल, तर मृत्यूची धास्ती घेण्याचे काय कारण..?

३. क्रोध त्याज्य आहे:

क्रोध हे अहंकाराचे सर्वोच्च प्रतीक आहे. राग केल्याने माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. स्मृती भ्रमिष्ट होते. स्मरणशक्ती नाहीशी झाली म्हणजे माणसाचे विचारविश्व उघडे पडते. बुद्धी भ्रष्ट झाली म्हणजे माणूस स्वताला नष्ट करतो.

स्वतःला जीवनमुक्त करा. असेही भौतिक जगात काहीही चिरंतन नाही. मृत्यू हे सत्य आहे. आत्मा हा अमर आहे. क्रोध त्याज्य गोष्ट आहे. राग दाखवून काय कराल? तुमचे स्वत:चे आयुष्य तुमच्या नियंत्रणात नाही. मग इतरांचे काय घेवून बसलात. म्हणून रागाचा त्याग करा.

४. कोणीच कोणाचे नाही:

हे माझे, ते माझे हे सर्व खोटे आहे. कोणीही कोणाचे नाही. जिथे जीवनच क्षणभंगुर आहे, तिथे नात्यांना काय किंमत? आपला आत्मा अमर आहे, मग आपण फक्त जन्म घेत आहोत. वेगवेगळ्या शरीरांत. तू आणि मी खूप जन्म घेतले आहेत. मला तुझे सर्व जन्म ठावूक आहेत. पण तुला माझे आणि तुझे नाहीत.

जो मागील जन्मात तुझा होता, तो या जन्मी तुझा नाही. हा अनंतकाळाचा प्रवास आहे. नात्यांमध्ये अडकून राहण्यापेक्षा हे सत्य जाणून घेणे चांगले.


???? विनंती: खालील लिंकचा वापर करून आपल्या प्रियजनांना स्वराज्य डिजिटल मॅगझीनला जॉईन करा ???? http://swarajya24.com

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments