Tuesday, May 24, 2022
HomeLifestyleघरात असेल पाळीव प्राणी, तर मानसिक आरोग्य राहील ठणठणीत..!

घरात असेल पाळीव प्राणी, तर मानसिक आरोग्य राहील ठणठणीत..!

काही संशोधकांनी हा दावा केला आहे की मानसिक आरोग्य जपण्यासाठी पाळीव प्राणी फायदेशीर आहेत. नुकत्याच एका शोध अभ्यासातून हे समोर आले आहे. तसेच, विचारांमधील नकारात्मकता कमी होऊन आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. अधिक सकारात्मक होतो.

इंग्लंडमधील मँचेस्टर विद्यापीठातील लेखक हेलन ब्रुक्स यांनी याबाबत माहिती दिली. कोरोना साथीच्या रोगामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि आपल्या मानसिक ताणतणावात भर पडलीय. म्हणून मानसिक आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे.

यासाठी आपण नियमित व्यायाम योगा करतोच. पण आजची ही पोस्ट पाळीव प्राण्याबद्दल आहे. मँचेस्टर विद्यापीठातील संशोधनामध्ये ही बाब समोर आली आहे. घरात पाळीव प्राणी असल्याने मानसिक आरोग्य चांगले राहते.

हेही वाचा  Video: दानवेंचा रुद्रावतार, बोनेटवरुन खाली उतरले, कार्यकर्त्यांना झापलं, पुन्हा बोनेटवरुन गाडीत बसले!

कुत्रा, मांजर यासारख्या पाळीव प्राण्यांमुळे गोंधळलेले मन शांत होते. आपल्यापैकी बरेच लोक हौस, छंद किंवा आवड म्हणून पाळीव प्राणी पाळतात, पण त्यांना मानसिक आरोग्य सुधारण्याची ही गोष्ट माहित असेल असं दिसून येत नाही.

संशोधन हेलन ब्रुक्स म्हणतात की “संशोधनात सहभाग नोंदवलेल्या मानसिक रुग्णांनी पाळीव प्राण्यांबद्दल आपले मत व्यक्त केले की मानसिक बाबतीत पाळीव प्राणी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. प्राण्यांच्या खेळकर व मिळून-मिसळून राहण्याच्या प्रवृत्तीमुळे मानसिक रुग्णांचा न्यूनगंड कमी झाला व आपला मानसिक आजार स्वीकारण्यास ते तयार झाले.”

पाळीव प्राणी कशाप्रकारे आपले मानसिक आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात हे आपण जाणून घेऊया.

१. निस्सीम प्रेम:

पाळीव प्राणी आपल्यावर बिनशर्त प्रेम करतात. यांचा मानसिक आधार हा निर्मळ व नि:स्वार्थी असतो. असा सोनेरी व प्रेमळ आधार आपले मित्र, नातेवाईक व कुटुंबियांकडून मिळू शकत नाही.

हेही वाचा  लालमहाल नाच-गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नव्हे, दोषींवर कारवाई करा, उदयनराजे संतापले

२. शारीरिक कसरत:

कुत्रा किंवा मांजर हे प्राणी प्रचंड चपळ असतात. आपण त्यांच्यासोबत फिरायला जातो तेव्हा आपला शारीरिक व्यायाम होतो. हे प्राणी दिसायला क्युट असल्याने अनेक लोकांना ते हवेहवेसे वाटतात.

यामुळे लोकांशी भेटीगाठी होतात. शारीरिक आरोग्य चांगले राहते. पेट्ससोबत नियमितपणे बाहेर फिरायला जाण्याने दिवसभर उत्साह जाणवतो.

अन्नपचन होते आणि सोशल लाईफ सुद्धा सुधारते. असे अनेक फायदे पाळीव प्राण्यांमुळे होतात.

३. तणावमुक्ती:

ऑफिसमध्ये काम करताना सर्वांना वर्क-फ्रॉम-होमचे आकर्षण होते. आता घरून काम सुरु असल्याने प्रचंड तणाव असतो. कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त काम घरून करावे लागते. त्यामुळे माणसाला सततच्या ताणतणावाला सामोरे जावे लागते.

हेही वाचा  इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करताना घात झाला; साताऱ्यात तरुणीचा मृत्यू

अशावेळी पाळीव प्राण्यांसोबत थोडा वेळ घालवला तरी मन शांत होते. नेहमी कोणतीही अपेक्षा न ठेवता हे प्राणी किती निर्मळपणे जगतात हे बघून आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो.


???? विनंती: खालील लिंकचा वापर करून आपल्या प्रियजनांना स्वराज्य डिजिटल मॅगझीनला जॉईन करा ???? http://swarajya24.com

???? जाहिरातिसाठी संपर्क: 77220 35765

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments