Tuesday, May 24, 2022
HomeLifestyleनाभीमध्ये तेल घाला व अनेक समस्या सोडवा..!

नाभीमध्ये तेल घाला व अनेक समस्या सोडवा..!

नाभीमध्ये तेल घातल्याने शरीराला अनेक फायदे होतात. नाभी म्हणजे मानवी जीवनाचा आरंभ समजला जातो. कारण बाळ आईच्या गर्भात असताना नाळेशी जोडलेले असते आणि ही नाळ बाळाच्या नाभीशी जुळलेली असते. त्यातूनच अर्भकाच्या वाढीसाठी आवश्यक सर्व पोषक घटक आईकडून बाळाला पुरवले जातात. नाळ म्हणजे माणसाची जीवनदायिनी असते.

रात्री झोपताना नाभीमध्ये तेल घातल्याने अविश्वसनीय फायदे दिसून येतात. शरीराचे सर्व अवयव नाभीशी जुळलेले असतात. म्हणून नाभीत तेल घातल्याने सर्व समस्या सोडवता येतात. कोणकोणत्या आजारांवर नेमके कोणते तेल नाभीत घातल्याने फायदा होतो ते आपण बघूया.

हेही वाचा  बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार? पटोलेंचा शिवसेनेवर पलटवार

१. जुनाट सर्दी व कफ:

कापसाचा बोळा अल्कोहोलमध्ये बुडवून नाभीवर लावल्यास जुनाट सर्दी-कफ सुद्धा बरे होतात.

२. सांधेदुखी व ओठ फुटणे:

मोहरीचे तेल किंवा राईचे तेल यांचे काही थेंब नाभीमध्ये टाकल्यास सांधेदुखी किंवा ओठाला तडे पडण्याची समस्या कमी होते.

३. चेहऱ्यावरील डाग, रुक्ष त्वचा:

बदाम तेलाचे काही थेंब नाभीमध्ये टाकल्यास चेहऱ्यावरील डाग मिटतात. तसेच त्वचा रुक्ष झाली असेल तर गायीच्या तुपाचे काही थेंब नाभीमध्ये टाकावेत. त्वचा मुलायम होते.

४. मुरूम व पुरळ

कडुलिंबाचे तेल नाभीत टाकून थोडा मसाज केल्यास मुरूम व पुरळ बरे होतात. त्वचा सुंदर होते.

हेही वाचा  'नफरत का जवाब नफरत से मिलेगा'; अबू आझमी यांचा राज ठाकरे यांना टोला

५. मासिक पाळी व हार्मोन बदल:

कापसाचा बोळा ब्रॅन्डीमध्ये भिजवून नाभीवर ठेवल्यास मासिक पाळीत पोट दुखणे व हार्मोनल बदल होऊन चिडचिड होणे अशा समस्या कमी होतात.

६. केस गळती:

मोहरीचे तेल नाभीवर लावल्यास व नियमितपणे मालिश केल्यास केस गळतीची समस्या कमी होते. याशिवाय आपले केस अधिक मजबूत होतील.

हेही वाचा  खाकीतला देव माणूस: दिव्यांग श्रेयसच्या हाताला दर्दी अधिकाऱ्यांनी दिले बळ !

७. गुडघेदुखी व सांधेदुखी:

मोहरीच्या तेलाचे काही थेंब नाभीमध्ये टाकल्यास गुडघेदुखी व सांधेदुखी यापासून आराम मिळतो.

८. दृष्टीदोष:

नारळाचे तेल नाभीवर लावले तर डोळ्यांच्या समस्या सुटतात. दृष्टी सुधारते.

९. प्रजननक्षमता:

ऑलिव्ह ऑईल किंवा नारळाचे तेल याचे काही थेंब नाभीवर लावून हळूवार मसाज केल्यास प्रजनन क्षमता वाढते.


???? विनंती: खालील लिंकचा वापर करून आपल्या प्रियजनांना स्वराज्य डिजिटल मॅगझीनला जॉईन करा ???? http://swarajya24.com

???? जाहिरातिसाठी संपर्क: 77220 35765

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments