Tuesday, May 24, 2022
HomeLifestyleही फळे फ्रीजमध्ये ठेवणे टाळा.. नाहीतर होतील दुष्परिणाम !

ही फळे फ्रीजमध्ये ठेवणे टाळा.. नाहीतर होतील दुष्परिणाम !

अन्नपदार्थ ताजे व थंड ठेवणे हे फ्रीजचे मूळ काम आहे. आपण जवळपास खाण्याच्या सर्वच वस्तू सध्या फ्रीजमध्ये ठेवतो. पण काही पदार्थ असेही असतात की जे फ्रीजमध्ये ठेवायला नकोत.

आपल्याला असे वाटते की पालेभाज्यांप्रमाणे फळेदेखील फ्रीजमध्ये ठेवली, तर ती बराच काळ टिकून राहतील. ताजे राहतील व खराब होणार नाहीत. पण असे अजिबात नाही. काही भाज्या व फळे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. पण सर्वच नाहीत.

काही फळे फ्रीजमध्ये ठेवली तर त्यांची गुणवत्ता खराब होते. चव जाते. काहीवेळेस अशी फळे तब्येतीला अपायकारक ठरू शकतात. विशेषतः गर असणारी रसाळ फळे, नाजूक फळे फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. अशी कोणती फळे आहेत जी फ्रीजमध्ये ठेवू नयेत ते आपण जाणून घेऊया.

हेही वाचा  आता शेतकरी संपाचे रणशिंग फुंकणार? उद्या पुणतांब्यात ग्रामसभा

आंबा:

आंबा हे नाजूक फळ आहे. ते लवकर पिकते. त्यातल्या त्यात आंबा कार्बाइडने पिकवला असेल तर मग पाण्यात मिसळल्यामुळे लवकर खराब होतो.

फ्रीजमध्ये अन्नपदार्थांचा संबंध पाणी, थंडावा व बर्फाशी असतो. त्यामुळे आंबे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. त्यांच्यातील अँटीऑक्सिडंट कमी होऊ शकतात. यामुळे आंब्यातील पोषक तत्वे नष्ट होतात.

सफरचंद:

सफरचंदांमध्ये एक्टिव्ह एन्झाईम असतात. यामुळे सफरचंद वेगाने पिकते. त्यातही आपण ते फ्रीजमध्ये ठेवलं तर लवकर पिकतं. त्यामुळे सफरचंद फ्रीजमध्ये ठेवू नये.

सफरचंद जास्त काळ साठवून ठेवायचे असतील, तर ते कागदात गुंडाळून ठेवा.

टरबूज:

उन्हाळ्यात सर्वांचे आवडते फळ म्हणजे टरबूज. उन्हाळ्यात घामावाटे उत्सर्जन भरपूर होत असल्याने शरीरातील पाणी कमी होते. ती पाण्याची पातळी भरून काढण्यासाठी आपण टरबूज मोठ्या प्रमाणात खातो.

पण टरबूज हे फळ मोठे असते. एकाच वेळी संपवणे कठीण असल्याने नंतर खाण्याच्या उद्देशाने आपण ते कापून फ्रीजमध्ये ठेवतो. प्रत्यक्षात हे चुकीचे आहे. टरबूज-खरबूज कधीही कापून फ्रिजमध्ये ठेवू नये.

हेही वाचा  संभाजीनगरचा पाणी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही झोपणार नाही, सत्ताधाऱ्यांना झोपू देणार नाही: फडणवीस

टरबूज-खरबूज फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांच्यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म नष्ट होतात. खाण्यापूर्वी काही वेळासाठी ही दोन्ही फळं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता.

केळी:

केळी फ्रिजमध्ये ठेवल्यास लगेच काळी पडते. त्यातून इथिलीन गॅस उत्सर्जित होतो. त्यामुळे केळी हे फळ कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये.

या इथिलीन गॅसमुळे फ्रिजमधील इतर फळे देखील लवकर पिकतात. म्हणून केळी कधीही फ्रीजमध्ये किंवा फ्रीजबाहेर इतर फळांसोबत ठेवू नका.

हेही वाचा  "शेवटी संदीपच्या बायकोने पोलिसांना फ्रीज पण उघडून दाखवला की तो नाहीये घरात"

लिची:

लिची हे फळ उन्हाळ्यात खायला स्वादिष्ट वाटतं. पण हे चुकूनही फ्रिजमध्ये ठेवून नका. लिची फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याचा वरचा भाग नेहमीसारखाच दिसतो.

परंतु, आतला भाग ज्याला आपण गर (पल्प) म्हणतो, तो खराब होऊ लागतो. त्यामुळे फळ खाण्यायोग्यही राहत नाही. म्हणून लिची कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये.

याशिवाय बिया असणारी फळे बोरे, चेरी, पीच हे देखील फ्रीजमध्ये ठेवू नयेत.


???? विनंती: खालील लिंकचा वापर करून आपल्या प्रियजनांना स्वराज्य डिजिटल मॅगझीनला जॉईन करा ???? http://swarajya24.com

???? जाहिरातिसाठी संपर्क: 77220 35765

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments