एका संशोधनानुसार, आठ वर्षे वयापर्यंतची मुले रोज पाच तास मोबाइल स्क्रीनसमोर असतात. या वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. मोबाईल, टॅब्लेटसारख्या गॅजेट्सचा प्रकाश किती धोकादायक असतो ते आपण जाणून घेऊया. यामुळे 6 मोठे धोके संभवतात.
१. कॅन्सर:
मोबाईलमधून उत्सर्जित होणारा निळा प्रकाश आणि झोपमोड होण्याचा संबंध सापडला आहे. यामुळे स्तन आणि प्रोस्टेट कॅन्सर होऊ शकतो.
२. रेटिना प्रॉब्लेम:
जास्त वेळ स्मार्टफोन वापरल्याने त्यातून emit होणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे रेटिनाचे नुकसान होते. दृष्टीवर परिणाम होतो.
३. स्मरणशक्ती:
मोबाईल स्क्रीनवर पुन्हापुन्हा फ्लॅश होणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे झोपमोड होणे, अपुरी झोप होणे, निद्रानाश होणे अशा समस्या निर्माण होतात. यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते. सहजपणे लक्ष विचलित होते. स्मरणशक्तीवर परिणाम होतो.
४. औदासीन्य:
मोबाईलच्या निळ्या प्रकाशामुळे मेलॅटोनिनवर परिणाम झाला आहे किंवा शरीरचक्र बिघडले आहे, अशा लोकांमध्ये जास्त औदासीन्य आढळून येते.
- लठ्ठपणा:
गॅजेट्सच्या निळ्या प्रकाशामुळे मेलॅटोनिन या झोप व भूक नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकावर परिणाम होतो. यामुळे लठ्ठपणा वाढतो आहे.
६. न्यूरोटॉक्सिन:
दीर्घकाळ झोप कमी झाल्यास किंवा झोपमोड पुन्हा पुन्हा होत राहिल्यास शरीरात न्यूरोटॉक्सिनची निर्मिती होऊ लागते. यामुळे चांगल्या झोपेची शक्यता आणखी कमी होते.
???? विनंती: खालील लिंकचा वापर करून आपल्या प्रियजनांना स्वराज्य डिजिटल मॅगझीनला जॉईन करा ???? http://swarajya24.com
???? जाहिरातिसाठी संपर्क: 77220 35765