Tuesday, May 24, 2022
HomeLifestyleट्रॅफिक लाईट्सचे महत्त्व काय..? रंजक माहिती जाणून घ्या…

ट्रॅफिक लाईट्सचे महत्त्व काय..? रंजक माहिती जाणून घ्या…


मोठ्या रस्त्यांवर चौकाचौकात लावलेले वाहतूक दिवे (ट्रॅफिक लाईट्स) आपण रोज बघतो. यात मुख्यत्वेकरून तीन लाईट्स असतात. सर्वांत वर लाल, मग नारिंगी किंवा पिवळा आणि सर्वांत शेवटी हिरवा… काय आहे या रंगांचे महत्त्व आणि उद्दिष्ट ते आपण स्पष्टपणे जाणून घेऊया. वाहतुकीच्या नियमांच्या दृष्टीने ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.

ट्रॅफिक नियमांची माहिती असली की रस्त्यावरील अपघातांचे संभाव्य धोके आपण टाळू शकतो. यामध्ये लाल रंग धोका किंवा थांबा हा इशारा देतो. पिवळा रंग वाहन सुरु करण्याचा निर्देश देतो. हिरवा रंग मार्गक्रमण करण्याचा निर्देश देतो. परंतु या दिव्यांमध्ये हेच रंग का वापरले जातात याची आपण माहिती घेऊया…

लाल:

लाल सर्वांत भडक रंग आहे. डोळ्यांच्या रेटीनावर याचा सर्वाधिक प्रभाव पडतो. म्हणून लाल रंग खूप दुरून बघता येणे शक्य होते. लाल रंग हा रक्त, धोका, इशारा व मृत्यू यांचे संकेत देतो. म्हणून थांबण्यासाठी इशारा म्हणून लाल रंग वापरतात.

हेही वाचा  Digilocker: आता WhatsApp च्या एका क्लिकवर डाउनलोड करा महत्त्वाची कागदपत्रं, स्टेप बाय स्टेप असं जाणून घ्या

नारिंगी/ पिवळा:

पिवळा रंग हा दिशा, कृती व प्रगती यासाठी अभिप्रेत आहे. म्हणून या रंगाचा वापर वाहतूक दिव्यांमध्ये करतात. हा रंग उर्जेचा प्रतीक मानला जातो. यामुळे आपण रस्त्यावर मार्गक्रमण करायला तयार व्हावे हे समजते.

हिरवा रंग:

हिरवा रंग हा सुरक्षा, मुक्ती, उदारता, स्वातंत्र्य व शांतीचा प्रतीक मानला जातो. हा रंग डोळ्यांना सुखावह असतो. धोक्याची म्हणजे लाल रंगाची संपूर्णत: विरूद्ध बाजू म्हणजे हिरवा रंग. त्यामुळे रस्त्यावर कोणत्याही धोक्याशिवाय पुढे जाण्यास सुरक्षा आहे हे समजण्यास व पुढे जाण्यास हिरवा रंग मदत करतो.

हेही वाचा  तब्बल ९ हजाराची सूट, स्वस्त किंमतीत मिळतोय Oppo चा हा स्मार्टफोन

पहिला वाहतूक दिवा (ट्रॅफिक लाईट):

10 डिसेंबर 1868 यादिवशी लंडन येथील ब्रिटिश पार्लमेंटच्या समोर जगातील पहिला ट्रॅफिक लाईट लावण्यात आला होता. जे. के. नाईट नावाच्या रेल्वे इंजिनिअरने हे वाहतूक दिवे लावले होते. रात्रीच्या वेळी याचा वापर होत असे.


???? विनंती: खालील लिंकचा वापर करून आपल्या प्रियजनांना स्वराज्य डिजिटल मॅगझीनला जॉईन करा ???? http://swarajya24.com

???? जाहिरातिसाठी संपर्क: 77220 35765

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments